Feedbackकामत फार्म - एक सुंदर असा अनुभव -
खरोखरच निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा आस्वाद घेता आला व त्याबरोबरची कोकणची मेजवानी खूपच अप्रतिम होती. सर्व स्टाफच सहकार्य सुंदर. सर्व कुटुबांत परत परत येण्याचे ठिकाण म्हणजे कामत फार्म.
धन्यवाद.

श्री प्रविण गोपाळ कुलकर्णी

मी काही साहित्यकार किंवा लेखक नाही, परंतु काल पासून आलेले अनुभव व्यक्त करून धन्यवाद व आपुलकी चा एक प्रयत्न
- निसर्गाच्या सानिध्यात तयार केले एक अप्रतिम घर... हो घरच :-)
- ताई आणि सरांनी दाखवलेली आपुलकी,जिव्हाळा आणि इथे मिळालेला एकांत... अवर्णनीय.
- सर्व स्टाफ मेंम्बर्स जी काही सर्व्हिस देतात, त्यासाठी त्यांना सलामच केला पाहिजे.
- काल माझ्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांनी केलेली प्रत्येक गोष्ट वाखणण्या सारखीच.
- सर्व मिळालेल्या गोष्टींबद्दल धन्यवाद. आणि मनापासून शुभेच्छा.
"अन्नपुर्णा सुखी भव:"
आपला

वृशाली & नागेश कुलकर्णी

We have very nice experience while stay at kamat farm.
Very awesome place, clean, eco-friendly, nice to stay on and on.
The service is excellent & food is outstanding.
I have to visit this place again and again.
Thanking you Mr. & Mrs. Kamat for this

Umesh

अत्यंत निवांत व सुखदायक, आल्हाददायक निर्मल आनंद.
आजकालच्या जगात धकाधकीच्या जीवनात एक क्षण स्वतःसाठी व आपल्या घरातील लोकांसाठी वेळ देण्यासाठी व त्याच बरोबर निसर्गाच्या सानिध्यात पूर्ण पणे विसावा घेण्यासाठी दिलेला वेळ व पैसा अतिशय सार्थकी.
केवळ आपली माणस आपल्या घरात आल्याचा अनुभव व सर्वात महत्वाचे अन्नपूर्णाचे जेवण अतृप्त. परत परत यावे हि ओढ हेच "कामत फार्म" चे वैशिष्ट्य.

अरुण सा. वाघ

It’s a very excellent place, close to nature with good food. Friendly people.
Thanks to Mr. & Mrs. Kamat for making our new year memorable one.
We would defiantly like to visit again.

Avinash

कामत फार्म - एक अविस्मरणिय अनुभव !!!
अतंत्य सुंदर, निसर्गाच्या सानिध्यात वसलेल आणि अगदी आपलया घरच्या माणसांसारख्या माणुसकी जपणाऱ्या माणसांनी सज्ज असं अप्रतिम ठिकाण म्हणजे "कामत फार्म".
हरिहरेश्वर, श्रीवर्धन आणि दिवेआगर ही तिन्ही ठिकाणे अगदी जवळ असल्यामुळे हे ठिकाण अगदी सोईस्कर वाटले.
येथील सर्व सोयी, व्यायाम मशिन्स, indoor sports activities, children play area, swimming tank, वेगवेगळ्या फळझाडांनी अशी भव्य फळबाग हे सर्व खूपच सुखद वाटले. सगळा स्टाफ खूप supportive, cooperative असून खुद्द कामत सर आणि कामत मॅडम हे तर अगदी घरची माणसे असल्यासारखी वागणूक देणारी आहेत. आम्हाला Special काजु करी, धावन, etc. कोकणी पदार्थ खूपच आवडले.
आता घरी जायचा पण कंटाळा यावा असं सगळं वातावरण... पण आता निरोप घेतो... लवकरच पुन्हा भेटू. धन्यवाद!!!

सौ. हर्षदा क्षीरसागर

कामत फार्म मधील जेवण अतिशय रुचकर स्वादिष्ट असे आहे, सोलकढी तर उत्तमच आहे. कोकणात राहिल्याचे समाधान वाटले. येथील निसर्गरम्य वातावरण मनाला भुरळ घालते.
थोडक्यात "कामत फार्म = निवांत, शांत, निसर्गरम्य, प्रदूषण मुक्त असे ठिकाण" अशी वाख्या करायला हरकत नाही. येथील स्टाफ ने जलद व आपले पणाची सेवा दिली.

दिपक क्षीरसागर

कामत फार्म हे अबाल वृद्धांना हवेहवेसे वाटणारे ठिकाण असल्याचा अनुभव आला. पूर्णानंद हॉल मध्ये भोजनाचा आस्वाद घेऊन पूर्णानंद मिळाला. वास्तविक डी. जे. चा आनंद तरुण घेतात पण आम्ही इतके आनंदी होतो कि आम्ही वयस्कर असूनही डी. जे. चा आनंद लुटला. आंबरस खाण्यासाठी पुन्हा भेट देण्याची इच्छा ठेऊन निरोप घेते.

सौ. हर्षदा क्षीरसागर

Perfect village atmosphere, enjoyed the climate here which was necessary to refresh us, Room where we lived was big and cool.
Food was delicious and born appetite. Overall it was a great experience and we all had a wonderful time. Hopefully we will have another visit.

Agarwal Family

Kamat Farm is wonderful place for a stay and enjoying good food. Stay and surroundings so natural that we thought of staying for more days.
Will definitely visit again and again & recommend to others.

Arvind

address

Saigaon, Dam Road,

Near Harihareshwar,

Tal-Shrivardhan, Dist-Raigad.

Contact

+91 988 108 3352

+91 750 704 8311

+91 983 498 9571

+91 928 468 0318

Connect with us